अवैद्य बनावट दारू चा मांडला बाजार !!!बारगजे साहेब असले प्रकार नाहीच चालू देणार!!!

 उदगीर ,देवणी( एल पी उगीले) 


 


उदगीर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळेगाव या छोट्याशा गावात अवैद्य, बनावट दारूचा कारखाना काढून खुलेआम बाजार मांडला होता. या बाजाराच्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उदगीर येथील  दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन कल्पना दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक महादेव झेंडे यांच्या आधिपत्याखाली बी.के. अवचार,डी. एस. पाचपोळे, जवान काळे, पवार ,श्रीकांत, एन. टी. गुणाले, देशपांडे, निरीक्षक एस. आर. राठोड, आर. जी. राठोड इत्यादींच्या विशेष पथकाने यासंदर्भात अधिक माहिती घेण्याची मोहीम सुरू केली. लॉकडाऊन च्या काळात राज्य बंदी, जिल्हा बंदी आदेश असतानाच विशेष करून परमिट रूम, बार आणि दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी तळीरामांना आपली हौस पुरवण्यासाठी धावपळ करावी लागत होती. त्याच वेळी उदगीर, देवणी, जळकोट, निलंगा, शिरूर आनंतपाळ या भागात अनेक धाब्यावरून अवैधरित्या दारूची विक्री होत होती. राज्य बंदी, जिल्हा बंदी असल्यामुळे कंपनीकडून येणारा माल बंद असताना ही, मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध होत होती. ही दारू आली कुठून? आणि ते ही एमआरपी च्या तिप्पट-चौपट किमतीमध्ये विकली जात असल्याची चर्चा सर्वत्र चालू होती. या चर्चेचा धागा पकडून राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी विशेषतः उदगीर विभागाचे दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी यांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी तळीरामांना मिळत असलेली दारू ही बेचव आहे, बनावट आहे. रासायनिक द्रव्यांपासून  बनवलेली आहे. अशी ओरड केली जात होती. तरीदेखील व्यसनाधीन असल्यामुळे मिळेल त्या दारूवर त्यांना समाधान मानावे लागत होते. परिसरात होणारी ही चर्चा लक्षात घेऊन अनंत कारभारी यांनी विशेष प्रयत्न करून आपल्या गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळवायला सुरुवात केली. यादरम्यान परराज्यातून मद्य विक्री होत असलेल्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा तसेच जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी यासंदर्भात आदेश काढून चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे सांगितले. राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय उपायुक्त निलेश सांगडे, अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात होत असलेली अवैद्य, बेकायदेशीर मद्य विक्री, निर्मिती व वाहतूक या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. एका आठवड्यात या विभागाकडून अवैद्य मद्यनिर्मिती, विक्री व वाहतूक या विरोधात प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली. सदरील मोहिमेमध्ये 14 गुन्हे नोंदवण्यात आले. या गुन्ह्यातील चौदा आरोपींना अटक करण्यात आली. या मोहिमेत 90 लिटर  हातभट्टी, 73 लिटर देशी मद्य, 114 लिटर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य तसेच दारू बनवण्यासाठी अवैद्य मार्गाने जात असलेली 21 मेट्रिक टन मळी जप्त करण्यात आली. या मोहिमेमध्ये दोन टेम्पो एक बुलेट, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले असून या मुद्दे मालाची किंमत अंदाजे तीस लाख आहे. या मोहिमेच्या दरम्यानच तळेगाव तालुका देवनी येथील बनावट, अवैद्य दारूच्या निर्मिती संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे  सहाय्यक निरीक्षक उदगीर अनंत कारभारी व त्यांच्यासमवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी गोवा राज्यात निर्माण होणारी तीन हजार 139 लिटर भारतीय बनावटीचे मद्य, तसेच 2000 बाटलीची बुचे जप्त केली.  इंपिरियल ब्लू विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या सहा हजार 672 बाटल्या, मेकडॉल नंबर 1 विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 2064 बाटल्या, बॉम्बे स्पेशल व्हिस्की विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 2064 बाटल्या, लाईट हॉर्स विस्की विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या 360 बाटल्या असा एकूण गोव्यातील किंमती प्रमाणे सात लाख 51 हजार पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरील मालाची महाराष्ट्रातील किंमत चाळीस लाखाहून अधिक होऊ शकेल, असे जाणकार सांगतात. या मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक महादेव झेंडे, आर एम बांगर, एस आर राठोड, आर जी राठोड, बी के अवचार, डी एस पाचपोळे, ए ए देशपांडे, एन टी गुणाले, एच एस मुंडे, एस जी काळे, जी आर पवार, अनंत कारभारी, जी व्ही गोळे या पथकाने धाड टाकून या बनावट अवैद्य दारूचा सुळसुळाट करणाऱ्यांना ताब्यात घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट आणि अवैध पद्धतीने दारू बनवून लाॅकडावूनच्या काळात परिसरातील बहुतांश बार, परमिट रूम आणि धाब्यावर पुरवठा करून विक्री केल्याची चर्चा आहे. एका छोट्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात धंदा करणाऱ्यांनी लोकांच्या जीवनाशी खेळून भरमसाठ पैसा कमवल्याचे बोलले जात आहे. तळीरामाकडून पैसे लुबाडून ,त्यांच्याच आरोग्याशी खेळण्याचे पाप या नतभ्रष्ट लोकांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या धडक मोहिमेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यापुढेही अशा पद्धतीच्या बोगस, बनावट मद्य विक्री च्या संदर्भात किंवा वाहतूक होत असल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क करावे. असे आवाहनही त्यांनी केले आहे.


 


 


 चौकट


 


 "वही विस्की ,वही  ब्रांडी  और रम ।


 


पियक्कड किसे बताये अपना गम?


 


 या बनावट दारूची एक गंमत अशी आहे की, एकाच रसायनापासून वेगवेगळ्या सुगंधाचे मिश्रण करून वेगवेगळ्या कंपनीच्या बाटलीमध्ये ती दारू भरून विक्रीचे प्रकार होतात. याचा अर्थ रसायनमिश्रीत एकच द्रव्य, मात्र वेगवेगळ्या कंपनीच्या आणि ब्रँडच्या बाटलीमध्ये भरून त्याची विक्री करून ग्राहकाला फसवण्याचा मोठा बाजार या लोकांनी मांडलेला आहे. या दरम्यानच्या काळात किती मोठ्या प्रमाणात याची विक्री झाली? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र "देर आये, दुरुस्त आये" म्हणतात, त्याप्रमाणे या बनावट मद्याच्या कारखान्यावर धाड घालून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आभार मानले आहेत. कारण या  बनावट मद्याची कल्पना येऊन देखील हे दुःख तळीरामांना कुणापुढेही ही व्यक्त करता येत नव्हते. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून त्यांच्या भावनांचा बांध खुला केला आहे.


 


"हाय कमबख्त तूने पीही नही" 


 


आपण बनावट, विषारी मद्य पित आहोत. याची जाणीव होताच तळीराम ही दारू बनावट आहे. रसायनमिश्रीत आहे. अशा पद्धतीची वाचता करतात. त्यावेळेस त्याचे मित्र त्याला सल्ला देतात, असे असेल तर तू पितोस कशाला? तेव्हा आपली आदत सांगण्यासाठी तो गालिबच्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो," हाय कंबख्त तुने पी ही नही।"


 


लाखोंचा महसूल बुडाला!


 


 तळेगाव येथील या बनावट आणि अवैद्य दारू निर्मितीमुळे आणि विक्रीमुळे लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून राष्ट्राचे नुकसान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने ही दारू विक्री करून राष्ट्राचे नुकसान करणाऱ्यावर देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी केली जात आहे.


 


बाटल्या सील करण्याची मशीन !


 


बनावट मद्य निर्मिती केल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्यांमध्ये रासायनिक द्रव्य अर्थात बनावट मद्य भरल्यानंतर ओरिजनल कंपनीच्या बाटलीला जसे शील असते, तशाच पद्धतीने सील बनवून, भूच बसवून ती ओरिजनल वाटावी. अशा पद्धतीची पॅकिंग करणारी मशीन देखील या कारखान्याच्या ठिकाणी असली पाहिजे.