सौ. आशा बेजरर्गे या विविध पुरस्काराने सन्मानित

.


उदगीर...... उदगीर येथील सरदार वल्लभ भाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर येथील शिक्षिका *मा.सौ.आशा वसंतराव बेंजरगे* या सन २००९ साली *सरदार वल्लभाई पटेल प्रा. विद्यालय, उदगीर* या ठिकाणी रुजू झालेले आहेत. मॅडमचे शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेऊन, या संस्थेच्या बालवाडी प्रमुख *मा.सौ.अपर्णाताई पटवारी मॅडम* यांच्या हस्ते सन 2010-11 या साली *सौ.आशा बेंजरगे मॅडम* यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यांच्या शिक्षण कलेतील विशेष कार्याबद्दल शैक्षणिक वर्ष 2014-15 या साली संस्थेचे सध्याचे कार्यवाह *मा.डाॅ. अंबादासराव देशमुख सर* यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


                     त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तळमळीने व जिद्दीने कार्य करण्याची भावना ही कायम मॅडमच्या मनी नेहमीच राहात असते. तसेच शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजामध्ये समाजिक क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्य करण्याची सवय मॅडमला असल्यामुळे, त्यांना विविध क्षेतातील पुरस्कार देऊन गौरव यापूर्वी करण्यात आला. त्यांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावू आहे. सर्वांना आपलं समजून उत्तम प्रकारे कार्य करत असतात. 


                 *"मूर्ती लहान पण कीर्ती महान"* अशा आमच्या मॅडम आहेत. म्हणून त्यांना *बारा बलुतेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या* वतीने सण 2017-18 मध्ये *आदर्श कन्या* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सेमी विभागामध्ये त्यांनी खूप मोलाचे महत्वपूर्ण कार्य पार पाडलेल्या आहेत. कमी वयामध्ये जास्त कार्य करणे हा ध्यास त्यांनी काय मनामध्ये ठेवून सतत कार्यमग्न असतात. त्यांना शाळेविषयी जो आदर्श वाटतो तो आदर्श मनामध्ये बाळगून समाजामध्ये त्यांनी आपली शाळा ही उत्तम दर्जाची कशा प्रकारे करता येईल या विचारात असतात. शाळेतील प्रत्येक मुलांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या सर्वांगिन विकासाच्या बौद्धिक क्षमतेच्या आधारे आपल्या शाळेतील विद्यार्थी हे शिक्षण क्षेत्रांमध्ये उंच भरारी मारुन गरुड झेप कसे घेतील या विचाराने मॅडमनी स्वतःच संपूर्ण उभं आयुष्य आपल्या शिक्षण संस्थेला समर्पित केलेले आहेत.


                  8 मार्च रोजी असलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून सन 2018-19 मध्ये आमच्या शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने मॅडमला *आदर्श महिला* या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षी उदगीर शहराचे वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक अध्यक्ष *मा. चंद्रकांतअण्णा वैजापूरे* यांच्या वाढदिवसानिमित्त सेमी विभागाच्या आदर्श विभागप्रमुख म्हणून मॅडमला शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


*घर हे झोपडी असो किंवा बंगला, जर संस्काराची साथ असेल तर ते मंदीर झाल्याशिवाय राहणार नाही.* या विचारांशी संलग्नित असलेल्या आमच्या लाडक्या विभागप्रमुख मा.सौ.आशा बेंजरगे मॅडम यांनी विविध क्षेत्रात अतिशय जोखीम व मोलाची कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव नव्हे तर त्या एक आदर्श महिला, आदर्श आई, आदर्श शिक्षक असे अनेक पुरस्कार मिळविण्यामध्यें त्यांनी यश संपादन केलेले आहे.


                                त्याच बरोबर शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्येच *रंगकर्मी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान उदगीर* च्या वतीने या प्रतिष्ठानचे अध्यक्ष *मा.भिबीशन मद्देवाड सर* व सध्याचे उदगीरचे आमदार तथा महाराष्ट्राचे राज्यमंत्री *संजयजी बनसोडे साहेब* यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


      शैक्षणिक वर्ष 2020-21 या चालू वर्षांमध्ये *लॉयन्स रोटरी क्लब, उदगीर* यांच्या संयुक्त विद्यमाने या रोटरी क्लबचे अध्यक्ष *मा.श्री. विशाल तोडकर सर* सचिव *मा.सौ. कीर्ती कांबळे मॅडम* व प्रोजेक्टर चेअरमन *मा.श्री. किशोर पंदीलवार सर* यांच्या हस्ते 5 सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून *मा.सौ.आशा बेंजरगे मॅडम* यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अनेक पुरस्कारांनी त्यांचे यापूर्वी कौतुक करण्यात आलेले आहे.