.
उदगीर ..... "कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती" या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कार्य करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय व अत्यंत उपक्रमशील व समाज कार्यामध्ये सक्रीय असे शिक्षक श्री. रामेश्वर पटवारी यांना अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानजनक असा रंगकर्मी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी अत्यंत प्रतिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते देवून गौरवण्यांत आले. रामेश्वर पटवारी गेल्या वीस वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थी शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी कसं शिकलं पाहिजे, व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याचे काम त्यांनी अहोरात्र केलेले आहे. व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शाळेत व शाळा व्यतिरिक्त अतिरिक्त तास घेवून शिष्यवृत्ती क्लासेसचे आयोजन करण्यांत आले. त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. गणीत हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. पण आपल्या विद्यार्थ्यांना शिकविताना अत्यंत सोप्या पद्धतीने व कलृपत्यांचा वापर करून, शिकवितात. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय, शिष्यवृत्ती, एमटीएस अशा विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून त्यांच्याकडून अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करून घेवून, व शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचया पालकांना भेटून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले. उत्तम वक्ता व विविध विषयाचे गाढे अभ्यासक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य ते करीत आहेत. तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल उपजिल्हाधिकारी मा. प्रवीणजी मेंगशेटटी यांच्या हस्ते "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान नुकताच झालेला आहे.अशा या सर्व कार्याची नोंद घेणारे रंगकर्मी साहित्य कला, क्रीडा प्रतिष्ठानचे आयोजक व संयोजक माननीय श्री. प्रा.बिभीषनजी मदेवाड यांनी रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे श्री. रामेश्वर महादेव पटवारी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्री मा. शिवकांता सुतार व दुसरे महान अभिनेता श्री. संकेतजी कोरलेकर ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा मालिकेतील भिमराव आंबेडकर भुमिका फेम व टकाटक या चित्रपटात काम केलेले तसेच माननीय, श्री. सिद्धेश्वर मुन्ना पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर, व माननीय, श्री. अमोलजी कांडगीरे विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस उदगीर. व माननीय, श्री. चंदनजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष युथ राष्ट्रवादी काँग्रेस लातूर. माननीय, श्री. सतीशजी उस्तुरे साहेब, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यांत आला. व तसेच संस्थेचे सचिव डॉ.अंबादासराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष श्री. वट्टमवार सर ,संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष माननीय, श्री. उमाकांत बुधे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा कुलकर्णी, सेमी विभाग प्रमुख सौ. आशाताई बेजरगे, श्री. रोडे सर, रोहित पाटील सर, सौ. कांबळे मॅडम व शाळेतील इतर शिक्षकेतर कर्मचारी
यांनी अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या.