.
उदगीर
उदगीर तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी 'सुंदर माझे अक्षर' हा नाविन्यपूर्ण उपक्रम आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्य व्हाट्सअप्पद्वारे घेऊन विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली. या कोरोनाच्या काळातही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावे म्हणूनच ते नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितात.नंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी शुद्धलेखनात होणाऱ्या चुकासंदर्भात माहिती सांगितली. कांही जणांच्या शुद्धलेखनामध्ये दोन अक्षर एकमेकाला चिकटलेले आहेत हे दाखवून दिले. शुद्धलेखनाच्या वहितील अक्षर कांही विद्यार्थी खूपच लहान तर काही मोठे काढतात. हे दाखवून दिले. काही विद्यार्थ्यांनी दोन शब्दातील किंवा दोन अक्षरातील अंतर खूप कमी/जास्त घेतले आहे हे दाखवून दिले. शुद्धलेखनाच्या अक्षरात ढ, ल, ह, क्ष, ज्ञ हे अक्षर काही जणांनी व्यवस्थित लिहिलेच नाहीत त्या संबंधित अशा अक्षरांचा सराव कसा करावा हे ही प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले. इंग्रजी शुद्धलेखनातील कॅपिटल, स्मॉल लेटरमधील चूका समजावून सांगितल्या. तसेच इंग्रजीतील शुद्धलेखन कसे करावे या संदर्भातही विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. ज्या विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर आहे त्यांचे अभिनंदनही केले. त्यात कांबळे प्रज्ञा अण्णाराव- 5 वी, घटकार विष्णू बाबुराव- 6 वी, कुंजटवाड ज्ञानेश्वर रमाकांत- 7 वी, केशगिरे काशीनाथ परशुराम- 7 वी, कांबळे आर्यन अनिल- 7 वी, चलवाड निकिता बालाजी- 7 वी, हवा रुद्र पद्माकर- 8 वी, घुगे तुळशीराम भास्कर- 8वी, कुंजटवाड अस्मिता रमाकांत- 8 वी, होळे राजकुमार सुभाष- 9 वी, पाटील प्रतीक्षा दयानंद- 9 वी, होळे वैभवी सुभाष- 10 वी इ. विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
लेखनाला वेळ द्यावे, लेखन घाई-गडबडीत करू नये, लेखनात खाडाखोड करू नये, लेखनात विरामचिन्हांचा वापर केला पाहिजे, लेखनात नियमित सातत्य असले तरच अक्षर सुंदर बनू शकते. सुंदर अक्षर हा मनुष्याला शोभून दिसणारा अलंकार आहे. स्वच्छ, सुंदर आणि वळणदार अक्षराला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे त्यासाठी मनापासून सराव करणे गरजेचे आहे हेही 'सुंदर माझे अक्षर' या उपक्रमांतर्गत कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 'सुंदर माझे अक्षर' या त्यांच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.