.
देवणी... "अत्त : दीप : भव:* " *स्वयं प्रकाशित व्हा या तथागत गौतम बुद्ध ,महात्मा बसवेश्वर,महात्मा ज्योतिबा फुले,संत कबीर, यांच्या विज्ञानवादी विचारला प्रमाण मानून धर्म मार्तंडाच्या तावडीतून समाज सुटला पाहिजे* *म्हणून विविध प्रकारच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी विचारांची पेरणी करणारे अंधश्रद्धा कर्मकांडावर वेळोवेळी प्रहार करून समाज* *परिवर्तन करू पाहणारे तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार म्हणून प्रखरपणे अस्तिकतेवर प्रहार करून दैववादाला मूठमाती देऊन नास्तिकता प्रखरपणे मांडून बुद्ध, बसव,संत कबीर, फुले , शाहू यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही म्हणून प्रखरपणे फुले शाहू आंबेडकरी विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविणारे आंबेडकरी विचारांचे खरे बौद्ध उपासकआंबेडकरी चळवळीतील विचारांचे पाईक व विषमतावादी विचारांचे ऑपरेशन करून* *लोककल्याणकारी समतावादी विचार प्रस्तापित करू पाहणारे बोरोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पांडुरंग कलंबरकर साहेब हे होत*
कलंबरकर साहेबांचा जन्म कर्नाटक राज्यातील दापका तालुका औराद जि बिदर येथे झाला असला तरी प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी म्हणजे आजोळी भवानी दापका येथे झाले कलांबर साहेब यांनी आपल्या कुशल बुद्धिमतेच्या जोरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात विशेष प्राविण्य मिळवत त्यांनी पूर्ण केले आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी गुलबर्गा येथील महादेव अप्पा रामपुरे मेडिकल कॉलेज येथे प्रवेश मिळविला घरची परिस्थिती बेताचीच असताना अतिशय कठीण परिस्थितीत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे अडीच वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने सांगितलेले वैज्ञानिक तत्वज्ञान यांच्या विचारांशी जोडले गेले तदनंतर 12 राव्या शतकातील म बसवेश्वरांनी बुद्धाचा वैचारिक वारसा चालविला बसवेश्वर यांनी जातीयतेवर प्रहार करून समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले या महापुरुष यांच्या विचारांचा पगडा डॉ कलंबरकर साहेबावर असल्याने कायम फुले शाहू आंबेडकरांचे पाईक झाले बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचारांची ग्रंथ संपदा लायब्ररी घरातच निर्माण केली आज प्रत्येक महापुरुष यांच्या विचारांचे बरेच साहित्य डॉ कलंबरकर साहेबांकडे उपलब्ध आहेत" बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे *"ज्यांच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट ते घर केव्हाही होईल भुईसपाट*
त्याच प्रमाणे आपले आदर्श व आपले महापुरुष यांच्या प्रतिमा कायम समोर राहिल्यास त्यांचे आदर्श विचार आपल्या भावी जीवनात प्रेरणादायी ठरतील या महापुरुषाचे विचार आपल्या जीवनात तेवत ठेवल्यास आपली पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही
डॉ कलंबरकर साहेब हे पुरोगामी विचारांचे विज्ञाव वादावर निष्ठा असणारे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे बौद्ध उपासक आहेत हे मात्र नकीच .......!
डॉ कलंबरकर साहेबांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दलित शोषित बहुजन समाजातील दुःखी पिढीत लोकांचे अश्रू पुसून त्यांची सेवा करावी रंजल्या गंजल्या लोकांच्या दुःखावर फुंकर मारून त्यांना वेदनामुक्त करावे त्यांच्या दुःखात सहभागी होता यावे म्हणून गेली अठरा वर्षांपासून शासकीय रुग्णालयात सेवा बजावत आहेत साधे बी ए एम एस असनारे डॉक्टर आपली मोठं मोठी हास्पिटल खोलून भरमसाट पैसे कमविण्यासाठी धावपळ करीत आहेत शासकीय रुग्णालयात वेळ द्यायला तयार नाहीत परंतु डॉ कलंबरकर साहेब एवढे वैद्यकीय क्षेत्रात पारंगत उच्च शिक्षित असून सुद्धा ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब लोकांना सेवा देत आहेत डॉ कलंबरकर यांनी आजतागायत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात सहा वर्षे नांदेड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा तीन वर्षे व हिमायतनगर सरसम येथे तीन वर्षे सध्या बोरोळ येथील प्रधामिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावीत आहेत
डॉ कलंबरकर यांची फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विचारांशी बांधिलकी राहिली आहे त्यामुळे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे मेडिकल सारख्या उच्च शिक्षण घेत असलेल्या घेऊ पाहणाऱ्याअडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण फुलं नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचे नेहमी आव्हान करून गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतही डॉ कलंबरकर साहेबांनी मोठ्या प्रमाणात केले आहे असे अनेक विविध समाज कार्याच्या माध्यमातून समाज ऋण उतराई होण्याचे काम डॉक्टर करीत आहेत यांच्या हातूनअशीच समज सेवा घडो एवढीच सदिच्छा.....!
---- *गिरीधर गायकवाड नागराळकर*