.
उदगीर....... राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर. दिनांक 2 11 2020 वार सोमवार रोजी सरदार वल्लभाई पटेल जयंती निमित्त सरदार वल्लभाई पटेल यांचे व्याख्यान व तंत्रज्ञाना विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्रधान आचार्या सौ. मंजुषा ताई कुलकर्णी ह्या लाभल्या होत्या व तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून कम्प्युटर इंजिनिअर असलेल्या वक्त्या साहित्यकार अश्विनी देशमुख आचार्या व दुसऱ्या पाहुण्या अश्विनी कुलकर्णी आचार्या ह्या लाभलेल्या होत्या. या कार्यक्रमात वर्ग सहावी व आठवी च्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. व सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रभावी वक्तृत्व सादर केले. यामध्ये श्रावणी स्वामी, आनंदी स्वामी, प्रेम डांगे, वैदेही काकरे, प्रियंका कबाडे, अंकिता भिंगे अशा अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व तसेच सौ.मळभागे आचार्या व सौ.धोंडा आचार्या यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या वर आधारित स्वरचित कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी सूर्यवंशी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय ऋतिका उपाडे हिने केले. प्रमुख पाहुणे सौ अश्विनी देशमुख आचार्या यांनीलोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्याविषयी अतिशय प्रभावी माहिती सांगितली यात त्यांनी सरदार पटेल हे खंबीर प्रशासक त्यांची दृष्टी चौफेर व त्यांची निर्णयक्षमता प्रखर होती. राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती हे त्यांचे ध्येय होते असे सांगितले व तसेच विद्यार्थ्यांना प्रखर राष्ट्रभक्ती याविषयी गोष्ट सांगितली व स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट द्या असंही त्यांनी सांगितलं व तसेच दुनियेमध्ये कसे जगावे हेही सांगितलं व मोबाईल वरील गेम विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली अति गेम च्या वापरामुळे थिंकिंग प्रोसेस बंद होते असंही सांगितलं याविषयीचे अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली तसेच दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सौ अश्विनी कुलकर्णी आचार्यांनी ही ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती सांगून शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले व लॉकडाउन काळात ही ऑनलाईन कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना असतेच निर्माण करून दिलात याविषयी शाळेचे कौतुक केले तसेच अध्यक्षीय समारोप मंजुषा ताई कुलकर्णी शाळेच्या प्रधान आचार्या यांनी केले. सौ. धोंड आचार्या यांनी स्वागत गीत गायले. व कार्यक्रमाचे नियोजन सौ. मळभागे आचार्या व सौ. धोंड आचार्या यांनी केले.
अशाप्रकारे विद्यार्थ्यांसोबत सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली.