.
मनुष्याला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे ‘रंग’ होय. रंग ही एक मनाला अत्यंत आल्हाद देणारी गोष्ट आहे. पाळण्यातील तान्हया मुलालाही रंगाचे आकर्षण असते रंगसंवेदनेत फार मोठा आनंद साठवलेला असतो. निसर्ग विविध रंगांच्या नाना छटा दाखवतो. प्रत्येक ॠतूत तो वेगवेगळ्या रंगाने नटतो. आकाशात सकाळ संध्याकाळ विविध रंगाची उधळण सूर्यकिरण करत असतात छोट्या फुलपाखरापासून आपला मोठा पिसारा पसरणा-या मोरापर्यंत सुंदर रंगछटा मनाला आल्हाद देतात.
मनुष्य व प्राणी रंगमय विश्वात वस्ती करून राहिला आहे. दृश्यकलांमध्ये हा रंग अनेक प्रकारांनी अवतरतो. प्रकाशकिरणांचे विश्लेषण झाले, की इंद्रधनुष्याचे सात रंग उपलब्ध होतात. ‘फोटॉन’ (प्रकाशकण) परमाणू हे प्रकाशतत्त्वामागील मूलभूत द्रव्यघटक असतात, असे आधुनिक विज्ञान सांगते. प्राणिमात्राला रंगाचा अनुभव येतो, त्यावेळी डोळा हे बाह्य इंद्रिय बाहेरून येणारा प्रकाश नेत्रपटलावर स्वीकारीत असते. त्यातून निष्पन्न होणारी चेतना मज्जासंस्थेद्वारे स्वीकारली जाते. आधुनिक मज्जाशास्त्रात या दिशेने संशोधन सुरू आहे.
न्युटनच्या प्रकाशाच्या पृथःकरणात सप्तरंग (तांबडा, निळा, नारंगी, पिवळा, हिरवा, पारवा, जांभळा) आहेत. रंगाच्या कमी अधिक प्रमाणाच्या मिश्रणाने प्रकाशाचा रंग बनलेला आहे असा त्याचा अर्थ आहे.
न्युटनने सांगितलेले हे तत्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीकोणातील आहे. मानशास्त्रज्ञांची रंगाची तत्वे वेगळी आहेत चित्रकाराची रंगतत्वे वेगळी आहेत. येथे चित्रकाराच्या रंगतत्वांचा विचार करू, काही रंग स्वतंत्र अस्तित्व दाखवितात म्हणजे जे मिश्रणाने तयार होत नाहीत त्यांना मुळरंग किंवा प्राथमिक रंग किंवा प्रथम श्रेणीचे रंग म्हणतात.
मुळरंग : (प्रथम श्रेणी) तांबडा, पिवळा व निळा हे मुळ रंग आहेत. हे रंग कोणत्याही रंगाच्या मिश्रणातूनतयार होत नाहीत पण यांच्या मिश्रणातून असंख्य रंग व रंगप्रकार मिळतात.
परिणाम : हे रंग भडक व तेजस्वी असल्यामुळे या रंगाचा लहान मुलांच्यावर जास्त परिणाम होतो व लहान मुले या रंगांच्याकडे आकर्षिले जातात. म्हणून त्यांच्या चित्रातया रंगाचा जास्त उपयोग होतो.
दुय्यम रंग : (व्दितीय श्रेणी) कोणत्याही दोन मुळ रंगांच्या मिश्रणातून तयार होणार रंग म्हणजे दुय्यम रंग किंवा व्दितीय श्रेणीचे रंग होय.
उदा. तांबडा + पिवळा = नारंगी
तांबडा + निळा = जांभळा
निळा + पिवळा = हिरवा
परिणाम : नाविण्याच्या आवडीमुळे निरनिराळे रंग मिश्रणाने विविध रंग तयार करण्याची अभ्यासवृत्ती विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम करते. त्यामुळे प्राथमिक रंगापासून दुय्यम रंग ते मिळवतात.
तृत्तीय रंग : (तृत्तीय श्रेणी) करडे रंग : एक मुळ रंग व एक दुय्यम रंग यांच्या मिश्रणातून तृत्तीय श्रेणीचे रंग (करडे रंग) तयार होतात.
उदा. तांबडा + हिरवा = तांबडा करडा
पिवळा + जांभळा = पिवळा करडा
निळा + नारंगी = निळा करडा
अशा प्रकारे ढोबळमानाने रंग मिश्रणे आहेत. काळा व पांढरा हे रंग समजले जात नाहीत. कारण प्रकाश म्हणजे पांढरा व प्रकाश नसेल त्यावेळी अंधार म्हणजे काळा होय. थोक्यात काळा व पांढऱ्या रंगाच्या कमीजास्त मिश्रणाने अनेक रंग छटा मिळवता येतात.
रंग छटा : रंग छटा म्हणजे गडद छटा व उजळ छटा असे दोन प्रकार येतात. एखाद्या रंगात पाणी किंवा पांढरा रंग मिसळल्यास त्या रंगाची उजळ छटा तयार करता येते. व एखादया रंगात काळा किंवा त्या रंगाचा विरोधी रंग कमी अधिक प्रमाणात मिसळल्यास त्या रंगाची गडद छटा तयार करता येते.
रंगकांती : रंगाच्या तेजस्वीपणाचे विविध प्रकार म्हणजे रंगकांती कोणत्याही रंगामध्ये करडा रंगाचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण केले तर रंगकांती मध्ये बदल होतो.
रंग संगतीचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
अ) एकरंगसंगती--
ब )बहुरंगसंगती--
अ) एकरंगसंगती- यात एका रंगाच्या अनेक छटा असतात. एक रंगसंगतीचा उत्कृष्ट नमुना निसर्गाकडे पाहिल्यानंतर आपणास समजतो. निसर्गामध्ये हिरव्या रंगाच्या विविध छटा पहावयास मिळतात.
ब)बहुरंगसंगती :- यात विविध रंग व त्यांच्या छटा यांचा समावेश होतो.व्यावहारत ही पध्दत जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे या रंगसंगतीचे जास्त प्रकार पडतात.
१. संबंधित(मित्र ) रंगसगती (फ्रेन्डस कलर स्किम)– नारंगी व जांभळा हे दोन्ही रंग बनवताना आपण तांबड्या रंगाचा वापर करतो याचा अर्थ तांबड्या रंगाचा घटक हा या दोन्ही रंगात आहे. म्हणून तांबडा रंग हा जाभळा व नारंगी रंगाचा संबंधित किंवा मित्ररंग आहे.
ज्या दोन मिश्ररंगामध्ये ज्या मुळ रंगाचे घटक आहेत ते मिश्ररंग त्या मुळ रंगाचे संबंधित रंग होय.
उदा.तांबडा= नारंगी व हिरवा
पिवळा = नारंगी व हिरवा
निळा = हिरवा व जांभळा
२.विरोधी किंवा पुरक रंगसंगती (काँम्पलेमेंटरी/काँन्टरेस्ट कलर स्किम) ज्या मुळ रंगाचे घटक ज्या मिश्ररंगात नसतात तो त्या मुळ रंगाचा विरोधी रंग असतो. हे रंग एकमेकाच्या विरोधी असले तरी सारख्याच शक्तीचे असतात. ते एकमेकांना पुरक असतात. म्हणजे एकमेकांना उठाव आणतात. कारण दोन्ही रंगांचा एकमेकाशी संबंध नसतो. रंगचक्रातील समोरासमोरील रंग एकमेकांचे विरोधी किंवा पुरक रंग असतात.
उदा. तांबडा x हिरवा
पिवळा x जांभळा
निळा x नारंगी
विरोधी रंग संगतीचे उपयोग – निर्गामधील काही उदाहरणे पाहिल्यास आपल्या हे लक्षात येईल की पोपटाचा रंग हिरवा पण चोच तांबडी आहे. तो शोभिवंत दिसतो. जाहिरातीमध्ये जास्त करुन विरोधी रंगांचाच वापर करतात.
३. उष्णरंगसंगती(वार्म कलरा स्किम) :
ज्या रंगाचा परिणाम उष्ण, प्रखर, तेजस्वी असा वाटतो, त्यांना उष्ण रंग म्हणतात उदा. पिवळा, नारंगी, तांबडा हे उबदार रंग अगर उष्ण रंग आहेत. अग्नी मध्ये या तिन रंगांचे दर्शन आपणास होते. व अग्निमध्ये उष्णता असते.
उपयोग - युध्दप्रसंगाचे चित्रण, दुपारचे दृष्य, आनंद उत्सवाची दृष्य यासाठी या रंगसंगतीचा वापर करतात.
४.शीत रंगसंगती (कुल कलर स्किम)
ज्या रंगाचा परिणाम डोळ्याना आनंददायक, आल्हादकारक, शितल, शांतमय व उत्साही वाटतो त्यांना थंड रंग असे म्हणतात. उदा. निळा, हिरवा, जांभळा यात प्रामुख्याने निळा रंग हा शीत रंग आहे. रात्रीच्या चांदण्यात निळा रंग प्रामुख्याने दिसतो. पाण्याचा रंग निळसर छटायुक्त असतो. त्यामुळे निळारंग हा शीत रंगसंगतीचा प्रमुख रंग ठरतो.
शांतता, समृध्दी अशा प्रसंगचित्रासाठी याचा वापर करतात.
५. समतोल रंगसंगती-
वरील कोणत्याही प्रकारात न येणारी परंतू स्वतंत्र अस्तित्व दाखवणारी रंगयोजना. उदा. यात तृतीय व चतुर्थ रंगाचा उपयोग करतात. सर्व प्रकारचे ग्रे (करडे) रंग वापरतात.
उपयोग – धुके पडलले दृष्य, पावसाळी हवामान व अतिदुःखद प्रसंग दाखवण्यासाठी या रंगसंगतीचा वापर करतात.
६. उजळ रंगसंगती (लाईट कलर स्कीम)
जे रंग मूळ स्वरुपात म्हणजे पाणी न मिसळता वापरले तरी ते उजळ वाटतात. किंवा प्रत्येक रंगामध्ये पांढ-यारंगाचे मिश्रण करुन तो रंग वापरतात. त्यांना उजळ रंगसंगती म्हणतात.
उपयोग – वस्तुतील अगर प्रसंगाचित्रतील अथवा निसर्गदृष्यातील प्रकाशाची बाजू या रंगाने दाखवितात.
७. गडद रंगसंगती (डार्क कलर स्किम)
जे रंग मुळ स्वरुपात व पाणी मिसळून वापरले ती गडदच वाटतात किंवा कोणत्याही रंगात काळा रंग किंवा त्या रंगाचा विरोधी रंग मिसळून तो रंग गडद करून वापरतात त्यांना गडद रंगसंगती म्हणतात.
उपयोग – उषःकाल, रात्रीचे निसर्गदृष्य, हे गडद रंगात दाखवतात.
*रंगस्वभाव व वैशिष्ट्ये*
१. पिवळा – तेज, ऐश्वर्य, संपन्न्ता, उल्हास, तेजस्वीपणा, पहाटेचा सुर्य उगवतानांचे सोनेरी किरण, सोन्याचा रंग या गोष्टी संपन्न्ता संमृध्दीचे प्रतिक आहेत. या सर्व रंगामध्ये पिवळ्या रंगाचे अस्तित्व आहे. म्हणून या सर्वांचे प्रतिक पिवळा रंग होय.
२. निळा – विश्वास, औदार्य, सततता, अंतर शीतलता, गहनता, गांभिर्य व भव्यता.
आकाशाचा, अथांग समुद्राच्या पाणयाचा रंग निळा असतो. पाणी हे शीतल व शांततचे प्रतिक आहे. आकाश व समुद्र हे दोन्ही ही भव्य आहेत. म्हणून चित्रात भव्यत्ता, शांतता व शीतलता दर्शवण्यासाठी निळा रंग वापरतात.
३. तांबडा – तीव्रता, आग, क्रांती, धोका, दरारा, सुड, बेबंदशाही, उष्णता, राग, उन्माद, उग्रता व शौ-य. तांबडा रंग प्राण्यांच्या रक्ताचा रंग, त्या रक्ता संबंधी ज्या भावना आहेत त्यांचे सर्वाचे प्रतिक म्हणून हा रंग वापरतात. उदा. भय, शौर्य, राग इत्यादी.
४. नारिंगी – त्याग, तेजस्वीपणा, अग्नी. भारतीय धर्मगुरू सन्यासी यांना त्यागी म्हणत असे व त्यांचा वेश हा नारंगी रंगाचा असतो, हे संन्यासी त्यागाचे प्रतिक असतात. अग्नी मध्ये सुध्दा या रंगाचे अस्तीत्व असते. अग्नी हा अंधारास दुर सारुन तेजस्वी प्रकाशात रुपांतर करतो तो तेजाचे प्रतिक आहे.
५. हिरवा – मांगल्या, पावित्र्य, समृध्दि, शांती, थंडावा व दृष्टीसुख
निसर्गाती सर्वात महत्वाचा रंग हिरवा सृष्टीचे सौंदर्य हे या रंगानेच आहे. तसेच भारतीय स्त्रीचा सर्वात मागल्याचा प्रसंग म्हणजे नववधुचे रुप या नववधुचा शुंगार करण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या, साडी इत्यादींचा वापर प्रामुख्याने करतात. म्हणून हिरवा रंग हा मांगल्याचे व संमृध्दीचे प्रतिक आहे.
६. जांभळा – सत्य, प्रेम, छाया, राजवैभव
जांभळ्या रंगामध्ये निळा व तांबड्या रंगाचे मिश्रण आहे. निळा रंग हा भव्यतेचे प्रतिक आहे. व तांबडारंग शौर्याचे प्रतिक आहे. त्यामुळे जेथे भव्याता व शौर्य असते तेथे राजवैभव असते. म्हणून याला राजश्री रंग असे संबोधतात.
७. पांढरा – पावित्र्य, शुध्दता, तेज (रंगरहिन शुध्द स्वरुप) स्वच्छता, शांतता
शांततेचा संदेश देणे किंवा युध्द तह करणे, यासाठी पांढ-या रंगाच्या झेंड्याचा वापर करतात.
८.काळा – अज्ञान, अंधार, दुःख, शोक, भिती, निशेद, मृत्यू
अंधार म्हटले की मनात भिती असते. तसेच एखाद्या गोष्टीचा निशेद करण्यासाठी काळे झेंडे दाखवणे किंवा काळ्या फिती लावून काम करणे. म्हणजे काळा रंग निषेदाचे प्रतिक आहे.
९.करडा( राखी) – खिन्न्ता, दुःख
१०. विटकरी – शांतता, वार्धक्य, उदात्तता.
या प्रमाणे रंगाचा सुचकतेसाठी वापर करतात.
*रंगमाध्यम*
१. जलरंग
यामध्ये दोन गुणधर्म असलेले रंग आहेत
१. पारदर्शक २. अपारदर्शक
१. पारदर्शक रंग(जलरंग) – जो रंग दिला असता त्या खालील रंगपटल किंवा कागद दिसतो, तो पारदर्शक रंग. या पध्दतीत रंग लावण्या एैवजी तो रंगपटलावर हळूवार पध्दतीने सोडले जातात. यामध्ये पाण्याचा वापर जास्त असतो. या पध्दतीत रंगाचे एकावर एक जास्त थर दिले तर, ते रंग काळवटतात. रंगावर रंग चढवून विविध रंगमिश्रणाचे परिणाम घेता येतात.पण सावधपणे या गोंष्टींचा सराव करुन ते साध्य होते. रंगात पाणि किती प्रमाणात घ्यावयाचे हे ज्याच्या त्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. रंगछटा तयार करताना रंग थोडा ओला असताना त्यात दुसरा रंग मिसळावा लागतो. रंगांचा फिकटपणा, गर्दपणा व मध्यम भाग दाखवताना कौशल्याने ते रंग वापरावे लागतात. या करीता कागदाच्या पोताचा उपयोग करुन घेतला जातो. डेव्हिड कॉक, वॉटमन इत्यादी विदेशी व हात बनावटीचे देशी कागद वापरले जातात.
बाजारातील टुबमधील किंवा वडीच्या स्वरुपातील रंग हे पारदर्शक रंग असतात.
२. अपारदर्शक रंग (पोस्टर कलर)– जो रंग दिला असता खालील रंगपटल अगर कागदाचा पृष्ठभाग दिसत नाही त्यास आपारदर्शक रंग म्हणतात. हे रंग जलरंगासारखे न सोडता त्याचे कागदावर लेपन केले जाते. यात पाण्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो. यामध्ये उजळ छटा तयार करण्यासाठी पांढ-या रंगाचा वापर केला जातो. व गडद छटा तयार करताना काळा किंवा त्या रंगाचा विरोधी रंग मिसळला जातो. या रंगाना पोस्टर कलर असे ही म्हणतात. हे रंग बाजारामध्ये बाटलीमध्ये मिळतात.
३. पेस्टल रंग – रंगीत कोरड्या खडुच्या सहाय्याने चित्रे रंगवून त्यावर गोंदाचे पाणी देतात. याला पेस्टल ड्रॉइंग म्हणतात. सध्या गोंदाच्या पाण्याऐवजी फिक्सर स्प्रे चा वापर करतात.
सध्या आईल पेस्टल, वॉक्स पेस्टल, ड्राय पेस्टल, इत्यादी प्रकारचे खडु बाजारात उपलब्ध आहेत. काही खडूच्या कामावर पाणी सोडून जलरंगाचा परिणाम साधता येतो.
*रंगलेपनाच्या पध्दती* –
जलरंग लेपनाच्या काही पध्दती आहेत. एक सारखा रंग लावण्याच्या पध्दतीला थर (वाँश) म्हणतात. याचे प्रकार पुढील प्रमाणे.
१. एकसारखा थर (एकसंघ) - सर्व ठिकाणी एक सारखा थर देणे.
२. विभागीय (ग्रेडेशन) - क्रमाक्रमाने कमी अधिक होत जाणारा थर(वाँश) उदा. निर्सचित्रातील निरभ्र आकाश, त्रिमित वस्तू किंवा त्रिमित सौदर्यकृतीचा परिणाम दाखवताना दिलेला थर
३.खंडित रंग (ब्रोकन वाश) - मधुन मधुन तुटणारा किंवा रंग बदलता भासणारा लेप देतो. उदा. ढगाळलेले आकाश, वाळवंट, दाखवताना याचा वापर करतो.
४. एकावर दुसरा (ओहरलँप) एका रंगावर दुस-या रंगाचा थर देणे. उदा. सूर्योदयाचे आकाश रंगविताना याचा वापर करतात.
संकलन
महादेव शरणप्पा खळुरे
मो ८७९६६६५५५५

