लाईफ केअर येथील कर्किंनोजच्या शिबिरातील कॅन्सर पूर्व तपासणी मुळे सरव्हायकल कॅन्सरचा धोका टळला

 उदगीर 

 कॅन्सर शिबिरात तपासणी केल्यामुळे एका महीलेचा कॅन्सर चा धोका पूर्णपणे टळला असल्याचे कर्किंनोजचे डॉ अमोल गायकवाड यांनी सांगितले आहे . 

  लाईफ केअर येथे कर्किंनोज हेल्थ केअरच्या माध्यमातून   सर्व्हायकल कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले .या शिबिरात बत्तीस महिलांची तपासणी करण्यात आली . बार्शी येथील कॅन्सर तज्ञा मार्फत या रुग्णाची तपासणी करण्यात आली . यापैकी तीन महिलांना कॅन्सरचा धोका असल्याचे निदर्शनास आले . दोन महिलांना सी आय एन-१ तर एका महिलेला सी आय एन-२ (सर्व्हायकल इंट्राईपिथेलीयल नियोप्लाजिया) ही सुरुवात असल्याचे आढळले . यापैकी सी आय एन २ च्या रुग्णाला कोल्ड कॉअग्युलाशन ट्रीटमेंट देण्यात आली . यामुळे या महिला रुग्णाचा गर्भाशयमुख कॅन्सरचा  धोका पूर्णपणे टळला आहे . 

 भविष्यातील धोका टाळण्यासाठी ३० वर्षांवरील महिलांनी तातडीने तपासणी करून घ्यावी जेणे करून वेळीच निदान झाले तर भविष्यात होणाऱ्या गर्भाशय कॅन्सर पासून संपूर्णपणे मुक्तता मिळू शकते . कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही यासाठी वेळेवर आजाराचे निदान आणि उपचार होणे आवश्यक असल्याचे डॉ अमोल गायकवाड यांनी सांगितले