नूतन सभापती प्रा. डॉ. शिवाजी मुळे यांचा सत्कार व युवा नेते अजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेटचे वाटप


उदगीर...... राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व नवनाथ गायकवाड मित्र मंडळ उदगीर तालुक्याच्या वतीने नूतन पंचायत समिती सभापती प्रा.डॉ. शिवाजीराव मुळे व उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील तोंडचिर कर यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


.


अजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप पंचायत समिती उदगीर येथे करण्यात आले.


.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा निरीक्षक नवनाथ गायकवाड हे होते. सत्कारमूर्ती म्हणून नूतन पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ. शिवाजीराव मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष अजित पाटील तोंडचिरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहराध्यक्ष,शेख समीर, प्रा. गोपाळकृष्ण घोडके, उद्धवराव गंभीरे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष, कैलास पाटील, पंचायत समिती सदस्य नरसिंग जाधव, विदेश पाटील, मनोज गोंदेगावे, माधव कांबळे, रणजीत कांबळे, खाजा तांबोळी, शेख जावेद लोणीकर, विजय भालेराव व नामदेव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


       गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या विकासासाठी सत्तेचा उपयोग झाला पाहिजे असे मत आपल्या मनोगतातून प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे म्हणाले सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी प्रशासन गतिमान करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे अभिवचन दिले व मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व नवनाथ गायकवाड मित्र मंडळ उदगीर तालुक्याच्या वतीने नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीब गरजू व विधवा महिलांना अन्नधान्याचे किट, मास्क व सॅनिटायजर असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नवनाथ गायकवाड मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून गौरव उद्गार काढले. 


कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे लातूर जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन धनाजी बनसोडे यांनी तर आभार रा.काँ.सेवादलाचे उदगीर तालुकाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी मानले.


 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे उदगीर शहराध्यक्ष युवराज जोमदे, रामेश्वर जाधव, तुळशीदास वाघमारे, प्रशांत चपटे, माधव बनसोडे, मनिष मुळे, गोविंद कांबळे यांच्यासह रा.काँ. सेवाादल व नवनाथ गायकवाड मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.